Breaking News

Roselle Farming | कोरडवाहू भागात रोझेल ची शेती ठरत आहे फायद्याची! दरवर्षी मिळेल 3 लाखाचे उत्पादन;

 Roselle Farming

Roselle Farming | सध्याच्या महागाईच्या युगात पारंपरिक शेती म्हणजे शेतकऱ्यांपुढे मोठे आव्हानच आहे. या प्रकारच्या शेतीमध्ये जितके उत्पन्न मिळते त्यापेक्षा जास्त खर्च करावा लागतो. कित्येक शेतकरी अजूनही परंपरागत शेती करत आहेत. याचा कधी फायदा होतो तर कधी तोटा. पन बदलत्या काळानुसार आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून नावीन्यपूर्ण शेतीला चालना दिली तर नक्कीच शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. केंद्र शासन, राज्य शासन अशा शेतीला पुढे नेण्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबवत आहे. यामुळे अनुदानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ मिळतो व अगदी कमी खर्चामध्ये जास्त परतावा मिळतो.

मित्रांनो रोझेल ची शेती सुद्धा नाविन्यपूर्ण प्रकारामध्ये मोडत असून ह्या शेतीला कमी सिंचन लागते व इतर आधुनिक कार्य प्रणाली द्वारे ही शेती केली जाऊ शकते. रोझेल शेती च्या माध्यमातून प्रति एकर मागे वर्षाला तीन लाख रुपये पर्यंत उत्पादन मिळू शकते. आजच्या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला उत्तर प्रदेश मधील बुंदेलखंड या ठिकाणी राहणाऱ्या एका जागृत शेतकऱ्याची विशेष अशी यशोगाथा सांगणार आहोत. ज्यांनी पाण्याअभावी ज्यांची स्थलांतर झाले आहे अशा शेतकऱ्यांपुढे एक प्रकाश ज्योत म्हणून आपले उदाहरण सिद्ध केले आहे.

 

रघुवीर सिंग यांनी रोझेलची शेती कशाप्रकारे सुरू केली ते जाणून घ्या

प्रगतशील शेतकरी रघुवीर सिंह एका अशा भागांमध्ये राहत होते की ज्या ठिकाणी पाण्याअभावी शेती करणे कठीणच जात होते. खूप वर्षापूर्वीची ही गोष्ट असून पाण्याची मात्रा कमी असल्यामुळे शेती करता येत नसल्याने त्या गावांमधील अनेक शेतकऱ्यांनी इतर ठिकाणी स्थायिक होण्याची तयारी केली. अशा परिस्थितीमध्ये रघुवीर सिंह यांनी अजिबात हिम्मत हरली नाही. त्यांनी उद्यान विभागाला भेट देऊन एका औषधी वनस्पती विषयी पुरेपूर माहिती घेतली. माहिती घेतल्यानंतर पुढे उडीद मूग यासोबतच तेलबिया अशा विविध पिकांची शेती सोडून त्यांनी रोझेलची लागवड केली. आम्ही तुम्हाला आजच्या लेखाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की, रोझेल सोबत तुम्हाला उडदाची सुद्धा लागवड करता येते. रोझेल पीक मोठे होईपर्यंत तुम्ही उडदाचे मागणी करू शकता. अशा प्रकारे एका हंगामात तुम्ही दोन-दोन पीक घेऊन उत्पादन वाढवू शकता.

 

Roselle ची स्टेम, पाने, फुले मौल्यवान आहेत

मित्रांनो विशेष गोष्ट सांगायची झाली तर रोझेल ही एक औषधी वनस्पती असून त्याचे प्रत्येक भाग मौल्यवान आहेत. म्हणजेच त्याची पाने, देठ, फुले यांना बाजारात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.

 

एका रोपातून 600 किलो पीक मिळेल

या वनस्पतीच्या उत्पादनाचा विचार केला तर सर्वसाधारणपणे पाच ते सहा महिन्यांमध्ये एक एकर प्लॉटमधून चार ते सहा क्विंटल पर्यंत शेतमाल आपला निघू शकतो. बुंदेलखंड मधील हमीरपुर या ठिकाणी स्थायिक असणारा शेतकरी रघुवीर सिंह असे सांगत आहेत की, आम्ही इतर शेतकऱ्यांना माहिती देण्याकरिता एक शेतकरी उत्पादक संघटना स्थापन केली. त्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देखील दिले. रघुवीर सिंग यांनी केलेल्या प्रयत्नामुळे आता बुंदेलखंड विभागातील शेतकऱ्यांना त्यांच्या जवळपास बाजारपेठ उपलब्ध झाले आहे. लवकरच त्या विभागांमध्ये प्रक्रिया युनिट उभा होईल.

 

जाणून घ्या, रोझेलबद्दल संपूर्ण माहिती

मित्रांनो रोझेल या पिकाला विविध विभागामध्ये विविध नाव देण्यात आले आहेत. प्रामुख्याने या पिकाचे मूळ स्थान हे भारत व मलेशिया असून भारतात या वनस्पतीच्या फुलांना बिहार झारखंड या ठिकाणी स्थानिक भाषेमध्ये कुद्रम असे संबोधले जाते. विशेष गोष्ट म्हणजे हे पीक मालो या कुटुंबातील असून हे एक उष्णकटिबंधीय बारमाही पीक आहे. या पिकाचे झुडूप सर्वसाधारणपणे एक ते दोन मीटर पर्यंत उंच होते. याचा देठ विशेषतः लाल व जांभळ्या रंगाच्या आपल्याला दिसेल. विविध आकाराची याची फुले असतात आणि पाच पिवळ्या पाकळ्या असतात.

 

Rogel चे फायदे / Rogel चा वापर

मित्रांनो ही एक फायदेशीर वनस्पती असून या वनस्पतीच्या माध्यमातून पावडर, भाज्या, जेली, चटणी, सरबत, जाम, शीतपेय, वाईन इत्यादी गोष्टी तयार केल्या जातात. रोझेल या वनस्पतीला आंबट फळ सुद्धा म्हणतात. अल्कोहोलचा नशा कमी करण्याकरिता याचा वापर केला जातो. या वनस्पतीला आफ्रिकेमध्ये सुदाम चहा म्हणून ओळखले जाते. या वनस्पतीच्या माध्यमातून पाचक आजारांवर व खोकल्यावर उपाय केला जातो. लसूण, मिरची आणि इतर मसाल्यांसोबत या फुलाच्या पाकळ्या घेऊन चिटणी देखील बनवता येते…

No comments