Breaking News

Keshub Mahindra : अब्जाधीश उद्योगपती केशब महिंद्रा यांचे निधन; मृत्यूनंतर किती कोटीची संपत्ती सोडलीय माहितीय?

 नवी दिल्ली : भारतातील सर्वात वयोवृद्ध अब्जाधीश आणि महिंद्रा अँड महिंद्राच्या एमेरिटस चेअरमन केशब महिंद्रा यांचं आज निधन झालं. वयाच्या 99 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. फोर्ब्सच्या नुकत्याच जारी झालेल्या अब्जाधीशांच्या यादीत ते 16व्या स्थानी होते. त्यांनी त्यांच्या मागे 1.2 अब्ज डॉलरची म्हणजे 98,463,598,800.00 रुपयांची संपत्ती सोडली आहे. त्यांनी 48 वर्ष महिंद्रा ग्रुपचं नेतृत्व केलं होतं. 2012मध्ये त्यांनी चेअरमनपद सोडलं होतं. त्यांच्या निधनाने उद्योगजगतातून हळहळ व्यक्त होत आहे.

दिवंगत केशब महिंद्रा यांचा जन्म 9 ऑक्टोबर 1923 रोजी झाला होता. त्यांनी 1947मध्ये त्यांच्या वडिलांच्या कंपनीत काम करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर 1963मध्ये त्यांना महिंद्रा ग्रुपचे चेअरमन बनवण्यात आळं होतं. केशब महिंद्रा हे उद्योगपती आनंद महिंद्रा यांचे चुलते होते. वयाच्या 99व्या वर्षीही ते महिंद्रा अँड महिंद्राचे ते चेअरमन एमेरिटस होते. 2012मध्ये ग्रुपच्या चेअरमन पदावरून निवृत्त झाल्यानंतर आनंद महिंद्रा यांच्याकडे ही जबाबदारी आली होती.

केशब महिंद्र यांच्या निधनाने उद्योग जगतातून शोक व्यक्त केला जात आहे. वयाची शंभरी गाठण्यापूर्वीच ते फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत आले होते. त्यामुळे ते चर्चेत आले होते. केशब महिंद्रा यांनी पेन्सिलवेनिया विद्यापीठातून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. 1963मध्ये कंपनीची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी कंपनीला यशोशिखरावर नेले. त्यांनी आपल्या कार्यकाळात युटिलिटीशी संबंधित वाहनांच्या निर्मितीची ग्रोथवर भर दिला होता. विलीज जीपला वेगळी ओळख देण्याचं काम त्यांनी केलं.

No comments